अधीर मन झाले, मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधीर मन झाले
धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधुर घन आले
मी अशा रंगाची, मोतीया अंगाची
केवड्या गंधाची बहरले ना
उमगले रानाला देठाला, पानाला
माझ्या सरदाराला समजले ना
आला रे, काळजा घाला रे
झेलला भाला रे, गगन भरी झाले रे
अधीर मन झाले, मधुर घन आले
सोसला वारा मी, झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी बहकले ना
गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी
शिवारी साऱ्यांनी पाहिले ना
उठली रे, हूल ही उठली रे
चालरीत सुटली रे नि लाजरी झाले रे
अधीर मन, मधुर घन
धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे...